। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात मोठ्याप्रमाणात भाताची शेती खरीप हंगामात केली जाते. शेतकर्यांच्या घरात भाताच्या राशी साठून राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांची गैरसोय होत असल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून भाताची हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना खरेदी विक्री संघाला केली. त्यानुसार कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड या संस्थेकडून भाताची हमीभावाने खरेदी करण्याचे काम सुरु झाले आहे. शेतकर्यांनी आणलेल्या भाताचे पूजन करून आणि नंतर वजन करून हमीभावाने भाताची खरेदी कर्जत खरेदी विक्री संघात सुरु झाली आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेेटिव्ह अँड मार्कटिंग फेडरेशन लिमिटेडकडून भात आणि धान यांची हमीभावाने खरेदी करण्याचे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांना दिले आहेत. त्यानुसार कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड या संस्थेकडून भाताची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे.या उपक्रमाची सुरुवात कर्जत खरेदी विक्री संघात करताना शेतकर्यांनी आणलेल्या भाताचे पूजन करून आणि वजन करून भाताची खरेदी सुरु झाली आहे.
भाताची श्रेणी...
साधारण .. 2300 रुपये
अ दर्जा .. 2320 रुपये
आवश्यक कागदपत्र ...
2023-24 मधील पीक पाणी नोंद असलेला सातबारा उतारा
गाव नमुना 8 अ
बँक पासबुक
आधारकार्ड
हमी पत्र
आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर