| मुंबई | प्रतिनिधी |
अपघातात जखमी झालेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतवर मुंबईतील रुग्णालयात ऋष लिगामेंट सर्जरी होणार आहे. अपघातामुळे पंतला मोठ्या प्रमाणाच दुखापत झाली आहे. कार अपघातानंतर पंतच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही. दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत. दरम्यान, ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी खूप मोठा कालवाधी लागणार आहे. पुढील काही दिवस ऋषभ पंत मैदानावर दिसण्याची शक्यता नाही.