। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर येथील रितेश हासु गावंड (37) हे त्यांच्या राहत्या घरातून 2 डिसेंबर, 2023 रोजी नारंगी येथे जातो सांगुन निघून गेले. ते अजुनपर्यंत घरी परत आलेले नाहीत. रितेश यांची उंची 5 फुट 7 इंच आहे. अंगाने मध्यम, उभट चेहरा, जाड मिशी, अंगात शेवाळी रंगाचा फुल हाताचा शर्ट व काळया रंगाची फुलपॅन्ट घातली होती. तरी संबंधीत हरवलेल्या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळाल्यास पोयनाड पोलीस ठाणे 02143-252066 किंवा 9112060259 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रितेश गावंड बेपत्ता
