रोहन बोपण्णा अव्वलस्थानी

| सिडनी | वृत्तसंस्था |

43व्या वर्षी भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्षातल्या पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेमी फायनलमध्ये वाटचालीसह रोहन बोपण्णा दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 43 व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरणार आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर 2022 रोजी 38व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.

Exit mobile version