ग्रामीण जीवनोन्नती अभियान

| पनवेल | वृत्‍तसंस्था |

राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) संचलित स्वराज्य महिला प्रभाग संघ केळवणेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकताच पनवेल तालुक्यातील युसुफ मेहरअली सेंटरचे मधु प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी येथे संपन्न झाली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शैलेश कोंडसकर, विवेक भोपी, संतोष ठाकूर, अनिल कांबळे, निकिता भोईर, अनंत उघडे, साधना वाजेकर, तुकाराम गायकवाड, जयवंत महाडिक, मिलिंद बाचल, पूर्वा कदम, मयुरी म्हात्रे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट गट व्यवसाय श्रीसमर्थ स्वयं सहाय्यता समूह बारापाडा, उत्कृष्ठ उद्योजिका कासारभट येथील योजना पाटील यांच्यासह उत्तम वाटचाल करणाऱ्या 14 ग्रामसंघ व 14 सीआरपींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version