। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौकचे ग्रामपंचायत अधिकारी एस.पी. जाधव यांची नालंदा ऑर्गनायझेशन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामपंचायत अधिकारी एस.पी. जाधव हे कायद्याच्या चाकोरीतून मार्ग काढणारे आणि सर्वांशी संपर्क साधून विकास कार्यासाठी आवश्यक जनजागृती करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. इरसाल वाडी या दुर्घटनेत त्यांनी केलेले अतुलनीय कौशल्य पाहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनातील गतिमान आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख करून सन्मानपत्र दिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक संकटांना सामोरे जात ग्रामपंचायत हद्दीबाहेर कोरोनाला रोखून ठेवले होते. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, स्वच्छ पाणी, दिवाबत्ती, घर पट्टी यासारखे चोख काम आणि त्यावर उपाय केले आहेत. गाव, वाडी वस्ती येथे बैठकीचे आयोजन ते अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक यांच्यासह आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य ते कर्मचारी यांच्या सहकार्याने व सरपंच, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत आहेत.