। पनवेल । वार्ताहर ।
गणितीय कौशल्य आत्मसात करीत आपली अंगभूत क्षमता विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून आजचे विद्यार्थी अबॅकसच्या माध्यमातून गणितामध्ये प्राविण्य मिळवताना दिसत आहेत. संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत पनवेलच्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमीत या गणिती पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या संदर्भात घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी नैपुण्य संपादन करत एक प्रकारे यशाचे एव्हरेस्ट गाठले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षिका नयना थिटे यांनी मार्गदर्शन केले.
एवरेस्ट अबॅकस अकॅडमीकडून 33 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात करण्यात आले होते. यामध्ये एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी पनवेल शाखेच्या विद्यार्थ्यांना विशेष उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण अॅड. मनोज भुजबळ (माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका) आणि कोकण एज्युकेशन सोसायटी पनवेल येथील माजी शिक्षिका प्रशांती म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या पनवेल शाखेच्या मयुरेश लगारे यांनी पाच मिनिटात 110 बेरीज वजाबाकी सोडवून घवघवीत यश मिळवले. हर्ष थिटे, मयंक लगारे याने पहिल्या दहा क्रमांकामध्ये आणि स्वरांगी खडतर, पियुषी ठाकूर, रुही मोकल यांनी एक्सेलेंट रँक मिळवली. याशिवाय वैष्णवी जाधव, प्रियांशी ठाकूर यांनी बेस्ट रँक मिळवली आहे.