। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील गोफण गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण महादू कडू उर्फ अप्पा यांचे रवि.दि.११ डिसेंबर रोजी वयाच्या सुमारे ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक कडू यांचे वडील होत. सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून प्रत्येकाच्या सुख-दु:खात हमखास सहभागी होऊन कार्य करणारे नारायण कडू यांचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध होते.गोरगरीब लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते.तर आपल्या गोफण गावाच्या विकासात त्यांचा मोलाचा सहभाग होता.ते अत्यंत धार्मिक तथा श्रद्धाळू स्वभावाचे असल्र्याने त्यांनी आपल्या हयातीत नामचारी राधास्वामी सत्संग व्यास पंजाब या सांप्रदायासाठी आयुष्य वेचले.
त्यांच्या दु:,खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह,त्यांचे आप्तस्वकीय मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुन,जावई, नातवंडे असा फार मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्रवार दि.२३ डिसेंबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे