। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील साहिल कीर्ती राजाराम पाटील याने पुणे येथील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) 2021-24 च्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच, विद्यापीठाचा बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर अवॉर्डचा देखील तो मानकरी ठरला आहे. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्याला मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे. सध्या तो मुंबई येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रीसर्च या महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. साहिलचा अभ्यासाचा सराव, जिद्द व त्याचा प्रचंड आत्मविश्वास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे त्याला हे यश प्राप्त झाले असल्याचे वडील राजाराम पाटील व आई कीर्ती पाटील यांनी सांगितले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाबरोबर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.