नागरिकांना दिलासा
। वसई । प्रतिनिधी ।
वसई विरार शहरातील बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 83 रिक्षा, 10 मॅजिक गाड्या, 2 इको वाहन आणि 2 बसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वसई विरार शहरात बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न चिघलला आहे. बेकायदेशीर रिक्षाप्रमाणे वाहने, बस, इको वाहने यातून प्रवाशांची वाहतूक होत असते. अशा खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकींना परवागनी नसते. मात्र, त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे. यामुळे आता रिक्षाचालक आणि प्रवाशांची खासगी वाहतूक कऱणार्या वाहनचालकांमध्येच वाद होऊ लागले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे वसई वाहतूक विभागाने मागील आठवड्यापासून सर्वच प्रकारच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात मोहीम उघडली आहे. या कारवाईत आतापर्यंत 83 रिक्षा, 10 मॅजिक गाड्या, 2 इको वाहन आणि 2 बसवर कारवाई करण्यात आली आहे.