सख्खा भाऊच ठरला वैरी! लहान भावावर हातोडयाचे वार

| नागपुर | वार्ताहर |

दारूच्या नशेत मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.10) रात्री 11.00 वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस हद्दीतील पवनपुत्रनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली.

आकाश सरवन कनोजे (20), असे जखमीचे तर मंगेश सरवन कनोजे (25) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री 8 वाजता आकाश हा दारू पिऊन घरी आला आणि झोपला. त्यानंतर रात्री 10.30 वाजता मंगेशही दारू पिऊन आला आणि झोपला. रात्री 11 च्या सुमारास मंगेश उठला आणि त्याने पलंगाखाली असलेला हातोड्याने तीन वेळा आकाशच्या डोक्यावर वार केले. आकाशने आरडा-ओरड केली असता त्याची आई ललिता यांनाही जाग आली. त्यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकाशला मेडिकल रुग्णालयात दाखल केले आहे.

Exit mobile version