महिलेविरोधात पनवेल तालुका पोलिसांची कारवाई
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील कल्हे गाव तसेच नेरे गाव या ठिकाणी किराणा दुकानासह बेकायदा देशीदारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील कल्हे गावातील एका किराणा दुकानात बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास 1200 रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत केला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील नरे गाव येथे एक महिला तिच्या घराजवळून बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करण्यासाठी जवळपास 735 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या बाळगल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.