| अलिबाग | प्रतिनिधी |
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते माजी आमदार दिवंगत ॲड. दत्ता पाटील यांची मंगळवारी (दि.4) अलिबागमध्ये ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. अलिबागमधील जिल्हा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहातील ॲड. दत्ता पाटील उर्फ दादांच्या पुतळ्याला सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक नविनचंद्र राऊत यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यादरम्यान रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ग्रंथ मित्र नागेश कुलकर्णी यांनी दत्ता पाटील उर्फ दादांच्या कार्याची माहिती सांगून जून्या आठवणींना उजाळा दिला. गावे, वाड्यांमधील मुले शिकली पाहिजेत ही भूमिका ठेवून गावागावात शाळा सुरु करून गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केल्याची माहिती देखील नागेश कुलकर्णी यांनी दिली.
यावेळी संस्थेचे कार्यवाह संतोष बोंद्रे, ज्येष्ठ संचालक ग्रंथ मित्र नागेश कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, वाचनालयातील ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल रजिता माळवी, अपूर्वा वर्तक, अमित धुमाळ, अर्चना माळवी, अंकीत म्हात्रे, सुरेश काटे आदी उपस्थित होते.