अलिबागमध्ये शहीद दिनानिमित्त पदयात्रा

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तरुणांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्याकरिता तसेच क्रांतिकारकांचे बलिदान स्मरणात ठेवणे आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करणे याकरिता मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने व अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन अलिबागमध्ये केले होते. यावेळी भारत माता की जय, शहीद जवानअमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा जयघोष करण्यात आला. पदयात्रेत सुचिता साळवी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक- युवती, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Exit mobile version