श्रीमुखौ वरदान-मानाई देवीची समायात्रा

| कर्जत | वार्ताहर |

कोकणातील चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र दहिवली बुद्रुक येथील ग्रामदेवता श्रीमुखौ वरदान-मानाई देवीची त्रैवार्षिक समायात्रा दि. 23 ते 25 जानेवारी दरम्यान होत आहे. दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ, मुंबईतर्फे आयोजित या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण भारतात अंतत्य दुर्मिळ अशा त्रिमुखी वरदान देवीच्या आणी त्रिगुणातील मानाई देवीच्या मुख मंडळावरील रूप प्रसन्न व लोभसवाणे आहे. डोंगरात वसलेली शक्ती स्वरूप, विंद वासेनी अधिशक्ती पुढे वरदाण म्हणून प्रचलित झाली आहे. त्रिमुखी वरदान देवी भक्तांना वर देते आणि मानई देवी ते मान्य करून पूर्णतःवास नेते. भक्तांच्चा नवसाला पावणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे जागृत देवस्थान असा भाविकांचा विश्वास आहे. यात्रेचे अवचित्या साधून शालेय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, नेत्राचिकित्सा, कारणचिकिस्था, मोफत चष्मे वाटप, आरोग्य तपासणी आणी शेती विषेयक मार्गदरनेच अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दहिवली बुद्रक ग्रामस्थ प्रगती मंडळ, मुंबई आणी स्थानिक ग्रामथांच्या नियोजना अंतर्गत तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.

Exit mobile version