महाराष्ट्राच्या निर्मितीत लाल बावटा सर्वात पुढे: संजय राऊत

। पनवेल । प्रतिनिधी ।

महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष आहेत. एक शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना. त्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालेले नाही. आमच्या वाट्याला सतत संघर्षच आहे. असं वाटतं आता कुठे बरे दिवस येताहेत, की कोणीतरी मध्ये येते, आणि तुकडे करुन जातं. या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या, भूमीपुत्राच्या प्रश्नांवर सातत्याने लढे दिलेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

हा महाराष्ट्र गौतम आदानीने निर्माण नाही केला, हा महाराष्ट्र अंबानींनी निर्माण नाही केला, हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण नाही केला. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला, तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यात हा लाल बाबटा सर्वात पुढे होता. हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्वात पुढे होता. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अख्ख्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी समाज अग्रभागी असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version