। कर्जत । प्रतिनिधी ।
पुणे येथे झालेल्या एशियन पूमसे स्पर्धेत सौरभ गुरवची इंडीयन पूमसे टीममधून निवड झाली होती. सौरभने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत व्हिएतनाम सोबत अंतिम फेरीत (9-8) अश्या गुणांनी भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून दिले आहे. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडूंनी अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक पदक मिळवले आहे. या कामगिरीत सौरभ ने रौप्यपदक पटकवल्यामुळे हे पदक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. यावेळी प्रशिक्षक स्वप्निल अडुरकर व मोहिनी अडुरकर यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे. शिक्षकांनी सौरभचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.