। ठाणे । प्रतिनिधी ।
वर्ल्ड फूनाकोशी शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनतर्फे 10 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक आजिंक्यपद स्पर्धेत सोनल जेट्टीने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. या स्पर्धेमध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, रशिया, कजाकिस्तान, नेपाळ, मॉरिशियस, कुर्जिजस्तान, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, इटली, दुबई, पोर्तुगाल, केनिया, मलेशिया, जपान, इंग्लंड, इराण, अबुधाबी, भूटान, साउथ अरब इत्यादी देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी सोनल जेट्टीने महिला वयोगट 12-13 या गटात भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदके मिळवली आहेत. सोनलचे प्रशिक्षक जहीर शेख, सलीम अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनल प्रशिक्षण घेत आहे. सोनल ही ठाण्यातील खारटन रोड येथील रहिवासी आहे. ती मो. ह. विद्यालय शाळेची विद्यार्थिनी असून इयता नववीमध्ये शिकत आहे. तसेच, सोनल जेट्टीला 17 नोव्हेंबर रोजी विरार येथे महाराष्ट्र उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार विशाल जाधव आणि राजकपूर बागडी यांच्या हस्ते देण्यात आला आहे.