सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

। चिपळूण । प्रतिनिधी ।
कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांच्यावतीने एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून 301 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 298 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत व विद्यालयाचा शेकडा निकाल 99 इतका लागला आहे. विद्यालयातून प्रणव गडदे 96.20 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर श्रुती शिंदे 94.40% व श्रद्धा भालेकर व हर्ष शिवडे 93.60% गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटविण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विशेष प्रावीण्य 92 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 139 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी 62 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा उल्लेखनीय आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक रफिक मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, ज्युनिअर विभागाचे प्रमुख विजय चव्हाण, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख सलीम मोडक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version