माथेरान सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी सावंत

उपसभापती पदी घावरे बिनविरोध
| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये पार पडलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवरात्र पॅनलचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. मंगळावारी पॅनलच्या सर्वच्या सर्व तेरा विजयी उमेदवारांनी पतसंस्था कार्यालयामध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली.

या नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी अजय सावंत यांची तर उपसभापती पदी विनंती घावरे यांची बिनविरोध निवडणूक निर्णय अधिकारी श्याम कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली. ह्यावेळी राजेश दळवी, प्रसाद सावंत, प्रथमेश मोरे, मयूर जोशी, तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

माथेरानमध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून लवकरच दोन एटीएम सुरू करण्यात येणार असून पतसंस्थेचा कारभार लवकरच डिजिटल करून सध्या सदस्य संख्या ही वाढवण्यासाठी प्रयत्न करून पतसंस्थेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत.

– अजय सावंत, नवनिर्वाचित सभापती पतसंस्था माथेरान
Exit mobile version