शिक्षकांसाठी विज्ञान व गणित कार्यशाळा

| पाली | वार्ताहर |

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डाएट) पनवेल यांच्याद्वारे एससीईआरटी महाराष्ट्र आणि आयराईज आयसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायगड जिल्ह्यातील शिक्षक इनोव्हेशन कोचेस करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा श्री. छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वावोशी खालापूर येथे बुधवार पासून सुरू झाली. या कार्यशाळेचे उद्दिष्ट हे आयराईज उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, स्टेम शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न 7 इनोवेशन मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्याद्वारे करतील. सर्व सत्रांचे नियोजन दुसऱ्या टप्यात इनोव्हेशन चॅम्पियन्स उस्मान शेख, नरेंद्र जाधव, संतोष चौधरी, वर्षाराणी मुंगसे, विद्या साबळे तसेच टीम शिवानी पुलसे टीचींग असोसिएट,सुजित गोंडा टीचिंग फेलो यांच्या द्वारे घेण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे,ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणच्या तिसऱ्या टप्प्यातील हे तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. सुभाष महाजन, अधिव्याख्याता ममता पवार, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील , शाळा विकास समिती सदस्य, नरेश पाटील,संजय गवारी, मोरे उपस्थित होते. जिल्ह्यातील 60 गणित व विज्ञान प्राथमिक,माध्यमिक व साधनव्यक्ती यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना गणित व विज्ञान शिकविण्यास उपयोगी अशा उपक्रमांसाठी उपयोगी असे किट्स तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Exit mobile version