हातखंब्यात खवले मांजराचे खवले जप्त


रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून आज मोटारसायकलवरुन खवले मांजराची खवले घेऊन जाणार्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकंडील 3 किलो 464 ग्रॅम खवले मांजराची खवले जप्त केली. रत्नागिरी दहतवाद विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी वनविभागाच्या आधकार्यांची बैठक घेऊन एकमेकांच्या सहयोगाने कामगिरी करण्याचे आवाहन केले होते़. त्यानुसार वनविभागातील अनेक तज्ञांकडून 32 अधिकार्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर आज पोलीस उपनिरिक्षक विनायक नरवणे यांना हातखंबा येथून एक इसम खवले मांजराची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा रचून खवले मांजर घेऊन जाणार्या सचिन गजानन ढेपसे, वय 41, रा सुपलवाडी नाचणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील 3 किलो 464 ग्रॅम वजनाचे मांजराचे खवले जप्त केले. तसेच पोलीसांनी मोटारसायकल जप्त केली. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनायक नरवणे, सहाय्यक पोलीस फौजदार पांडूरंग गोरे, पोलीस हवालदार महेश गुरव, आशिष शेलार, राजेश भुजबळराव, परेश पाटोळे, उदय चांदणे यांनी केली.

Exit mobile version