पीएनपीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड व पीएनपी सायरस पूनावाला सीबीएसई स्कूल नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा 2024/2025 नुकत्याच पार पडल्या. 

या स्पर्धेत अलिबाग तालुक्यांतील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. पीएनपी होली चाईल्ड स्कूल वेश्वी अलिबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कुमार अर्णव महेंद्र पालकर 14 वर्ष वयोगटामध्ये तृतीय क्रमांक आणि कुमारी श्रावणी निकेत भगत 19 वर्ष वयोगटामध्ये पाचवा क्रमांक मिळवून त्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, होली चाईल्ड एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेट्टे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय डाकी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version