बचत गटांना मिळाली केंद्रातून ‘उपजिवीका’

। सायली पाटील । अलिबाग ।
आज जगभरातील महिला या चूल, मूल आणि घर या जगाने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या कुंपणाला वाचा फोडून सातत्याने पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतात. पण मूळात त्यांच्या प्रयत्नांना सर्वात महत्वाची असते ती म्हणजे संधी. आणि अशीच संधी अलिबाग नगरपालिकेत मोडणार्‍या एकूण 36 व आणखी सहभागी झालेल्या 4 अशा एकुण 40 बचत गटांना उपजिवीका केंद्र अलिबागमधून देण्यात आली. या सर्वाची सुरुवात झाली तेव्हा याबद्दल लोकांना फारशी माहिती नसल्यामुळे वस्तूंचा खप फार थोड्या प्रमाणात होत होता. परंतु आता दोन आठवड्यानंतर या बचत गटांबद्दल लोकांना कळल्यामुळे फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद उपजिविका केंद्र अलिबागला मिळत आहे. या महिला बचत गटाच्या उपजिवीका केंद्र अलिबागमध्ये कुलस्वामिनी महिला बचत गट, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, नव्या महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, रिद्धी-सिद्धी महिला बचत गट, सारस्वत महिला बचत गट, भिमाई महिला बचत गट, गावदेवी महिला बचत गट, साई महिला बचत गट, ओमकार महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, समता महिला बचत गट, श्री स्वामी समर्थ महिला बचत गट, जय भवानी महिला बचत गट, विठोबा महिला बचत गट, श्री स्मरण महिला बचत गट, श्रीकृष्ण महिला बचत गट, कानिफनाथ महिला बचत गट, केजीएम महिला बचत गट, सौम्या महिला बचत गट, मोहम्मद महिला बचत गट, माशहल्ला महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट, सिद्धिविनायक महिला बचत गट, यशोदा महिला बचत गट, श्रीराम महिला बचत गट, रोज महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, मैत्री महिला बचत गट, मोरया महिला बचत गट, काळंबादेवी महिला बचत गट, भिसमिल्ला महिला बचत गट, संंत गोरोबा महिला बचत गट, मरूआई महिला बचत गट, सिद्धेश्‍वर महिला बचत गट, पात्रुआई महिला बचत गट, बल्लाळेश्‍वर महिला बचत गट, एकविरा महिला बचत गट, मोरेश्‍वर महिला बचत गट अशा एकुण 40 बचत गटांचा समावेश आहे.

या 40 बचत गटांमधील प्रत्येक बचत गटात 11 ते 12 महिलांचा समावेश आहे. त्यांना मिळालेल्या या संधीचं सोनं करीत त्यांनी या उपजिवीका केंद्र अलिबागमध्ये सहभाग नोंदवला आहे. रोज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8 ते साडेआठपर्यंत या महिला उपजिवीका केंद्रात विक्रीसाठी बसतात. घरातली सगळी कामं आवरून प्रत्येकजण एकाचवेळेला आणि संपूर्ण दिवसभर तिथे हजर राहणं शक्य नसल्याने प्रत्येक स्टॉलवर त्या त्या स्टॉलच्या बचत गटाची महिला दोन ते तीन तास अशी आळीपाळीने हजर राहते. या स्टॉल्सवर मसाले, पीठ, पापड-लोणची, कपडे व आता दिवाळी निमित्त लाडु, चिवडा, कंदील, तोरण, रंग-रांगोळी, पणत्या तसेच सकाळच्या नाष्टयामध्ये ईडली-चटणी, सुकट-भाकरी, दुपारचे जेवण व संध्याकाळच्या नाष्टयामध्ये पट्टी समोसा, चायनिज भेळ, पकोडे असे पदार्थ अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत.

Exit mobile version