| पुणे | प्रतिनिधी |
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (दि. 20) पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले.