| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून, मोहत गावात एका व्यक्तीने परसबागेत गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी गांजाचे पिक उद्ध्वस्त केले आहे. श्याम सिताराम भिसे, असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील मोहोत या गावातील श्याम सिताराम भिसे, रा. भिसे वाडी (61) याने तो राहत असलेल्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने सोमवारी (दि.19) रोजी दुपारी 3.00 वाजता या ठिकाणी छापा टाकून उद्ध्वस्त केली. यावेळी पाच ते सहा फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पाने असलेली उग्र वासाची ओलसर कांद्याची 16 झाडे व त्या झाडांचे कापणी तुकडे करून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कोठ्यात वजन केले. असे एकूण वजन2 किलो 48 ग्रॅम निव्वळ गांजाचे वजन 1किलो 988 ग्रॅम एकूण मिळून 50,000 च्या मुद्देमाला सकट गांजाचे पिक उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.