। पालघर । प्रतिनिधी।
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलीला धमकावून आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही आरोपीविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानीवली गावातील दोन तरुणांनी गावातील अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्याच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने गुन्हा मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी सूत्रे हलवत दोन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.