। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या लाजिरवाण्या घटनेने उरण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू केला आहे. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे, माझे पती, दोन मुलगे अनुक्रमे 10 व 9 वर्षाची दोन मुले 3 वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो. सोमवारी (दि. 13) सकाळी मी मुलीला शेजारच्या आंगणवाडीत 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता न तिला घरी आणली. त्यानंतर आई घरातील आई कपडे धुण्याघरात गेली. ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लायवूड लावून ठेवले होते. परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरिता रडू लागली. त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर (50) याने मुलीला रडण्याचे कारण विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले. आई काम आटोपून आली असता अंगणात मुलगी दिसत नाही म्हणून तिने दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारण केली. त्याने मुलगी गल्लीत खेळत असल्याचे सांगितले. आईने गल्लीत शोध घेतला. परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाजाजवळ असल्याचे त्याने सांगितले.
आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली. आईने तिला उचलून घरी आणले. त्यांनतर तिला ताप भरला म्हणून आईने तिला उरणमधील दवाखाण्यात नेले. परंतु औषध देऊन तीन दिवस झाले तरीही ताप उतरला नाही. त्यानंतर मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचे आईला सांगितले. आईने तात्काळ मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले. त्यानंतर आईच्या पाया खालची वाळू सरकली. तिने थेट मोर सागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश निवेतकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली. या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू केला आहे. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत आहे.