। मुंबई । प्रतिनिधी ।
ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानची सुटका झाली असली, तरी रोज या प्रकरणात नवनवीन धक्कदायक बाबी समोर येत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीने आर्यनला वाचवण्यासाठी के.पी.गोसावीला 50 लाख रुपये दिल्याचा गौप्यस्फोट सॅम डिसूझाने केला होता. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सॅम डिसूझाने हा दावा केला होता. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून सॅम डिसूझाचे नाव घेतले होते. आता याच आरोपाला बळकटी देणारे काही पुरावे समोर आलेत. शाहरुख खानची मॅनेजर पुजा दादलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागलं आहे.