| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सहकारमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कर्जत भात गिरण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शहर आघाडीचे शरद लाड यांची निवड झाली आहे. या सहकारी संस्थेवर सहकार आघाडीचे वर्चस्व आहे.
जुलै 2024 मध्ये कर्जत सहकार क्षेत्रातील भात गिरण संस्थेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. 13 संचालक असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील दांगट यांच्याकडे निर्धारित वेळेत संचालक शरद लक्ष्मण लाड यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी दाखल झाला होता. त्यामुळे विशेष सभेत शरद लाड यांची भात गिरण सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे दांगट यांनी जाहीर केले. या विशेष सभेला संचालक परशुराम घारे, नामदेव मोडक, गोविंद जाधव, महादेव लोंगले, प्रवीण देशमुख, अनिल रोकडे, नंदकुमार मोरे, बाळू थोरवे, रवींद्र मांडे, छाया वेखंडे, वंदना देशमुख, भगवान चव्हाण, शरद लाड आदी संचालक उपस्थित होते. यावेळी निवडणूककामी कर्जत भात गिरण संस्थेचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहकार्य केले.