| पाली/गोमाशी | वार्ताहर |
कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पडसरे येथे व्यवसाय पूर्व अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.
या राख्या तयार करण्यासाठी लागणारे लोकर, मनी, कॉटन लडी, दोरा, चक्र इत्यादी साहित्य आयबीटीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. गृह आणि आरोग्य निदेशिका नीलम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक राख्या बनविल्या. एक राखी तयार करण्यासाठी फक्त सात रुपये खर्च आला. पडसरे आश्रमशाळेतील विद्यार्थी हे निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांची विक्री शाळेतच झाली. याचा विद्यार्थ्यांना आनंद झाला.