शेकाप न्याय देणारा पक्ष – आशाताई शिंदे

। अलिबाग । वार्ताहर ।
शेकाप हा सर्वसामान्य, कष्टकरी जनतेसाठी लढणारा पक्ष असून त्याच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळू शकतो. असा आशावाद शेकाप राज्य महिला आघाडीप्रमुख आशाताई शिंदे यानी व्यक्त केला. पंजाबच्या जनतेने जसे आपला स्वीकारले तसे भविष्यातही महाराष्ट्रातील सुज्ञ जनता शेकापला स्वीकारेल असेही त्या म्हणाल्या. आगामी काळात राज्यात होणार्‍या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापला चांगले यश मिळेल, मराठवाड्यात शेकापची ताकद आ.जयंत पाटील यांच्या माध्यमातून वाढविण्याचा संकल्पही शिंदे यांनी केला. कंधार, लोहा मतदार संघात शेकापचे उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version