। भारत रांजणकर । अलिबाग ।
उरण तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांची आघाडी झाली असून या आघाडीच्या माध्यमातून संगीता प्रशांत म्हात्रे या थेट सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. शेकाप-शिवसेना आघाडीने दिलेल्या थेट सरपंचपदाच्या संधीचे सोने करुन दाखविण्याचा निश्चय निवडणूक रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराने केला आहे.

यावेळी संगीता म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांना जनतेबद्दल वाटणारी आत्मीयता दिसून आली. यावेळी त्यांनी अनेक शासकीय योजना घरोघरी पोहचविणार असल्याचे सांगितले. तसेच पाणी, विजेच्या समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत सदस्य म्हणून भरीव कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. 15 व्या वित्त आयोगातून रस्त्याचे काम प्रत्यक्ष करुन घेतले. महालक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी विविध शासकीय योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

महिलांसाठी त्यांनी पुढाकार घेत ब्युटी पार्लर, शिवणकला, टाकाऊतून टिकाऊ असे विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. निराधार, अपंगांसाठी विविध योजना सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला. अहोरात्र केलेल्या कामामुळे ग्रामस्थांनी देखील त्यांच्यावर विश्वास टाकला. लोकांच्या आग्रहामुळेच त्यांना उमेदवारीची संधी मिळाली असून या संधीचे सोने करुन दाखवेन असेही त्यांनी सांगितले. पिरकोनचे माजी सरपंच रमाकांत पाटील यांनी मागील कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर गावात विकासकामे केली आहेत. त्याचा फायदा निश्चित होईल, असा विश्वास देखील संगीता म्हात्रे यांनी व्यक्त केला.

माजी सरपंच रमाकांत पाटील यांनी यावेळी सांगितले की, या गावात शेकापक्षाला मानणारा मतदार आहे. आपल्या घराण्याची परंपरा देखील शेकापक्षाची आहे. वडिल कृष्णा दगडू तथा कृ.द. जोशी हे 14 वर्षे सभापती होते. स्व. प्रभाकर पाटील यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक निवडणूक आपण लढवित आलो आहोत. मागील कार्यकाळात शेकापच्या 9 जागा निवडून आल्या होत्या. यावेळी शेकाप-शिवसेना आघाडीच्या माध्यमातून सर्व 11 जागा निवडून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासनाची प्रत्येक योजना पिरकोन ग्रामपंचायतीत यशस्वीपणे राबविण्यात आल्याचा दावाही रमाकांत पाटील यांनी व्यक्त केला. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम आपण केल्याचे त्यांनी नमुद केले.

सरपंचपदाचे उमेदवार संगीता म्हात्रे यांच्या बद्दल बोलताना त्यांनी संगीता म्हात्रे यांनी सदस्य म्हणून काम करताना लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने योजना घरोघरी पोहचविण्याचे काम केले. त्यामुळेच घराणेशाही न करता यावेळी पक्षाने संगीता म्हात्रे यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगून त्या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
मागील पाच वर्षात करण्यात आलेली कामे
जॉब कार्ड
प्रधानमंत्री उज्वला योजना
जात प्रमाणपत्र वाटप
संजय गांधी निराधार योजना
श्रावणबाळ निराधार योजना
नवीन मतदार नोंदणी
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना
अन्न सुरक्षा योजना
नवीन रेशन कार्ड बनवणे
ई-श्रम कार्ड
प्रधानमंत्री किसान योजना केवायसी
आधार कार्ड (स्मार्ट कार्ड) बनवणे
कोरोना काळात युनिव्हर्सल पास बनवणे
मतदान कार्ड आधारकार्ड जोडणी
ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजना
उत्पन्नाचा दाखले वाटप
ज्येष्ठ नागरिकांना दाखले वाटप
अपंगाचे दाखले मिळवून देणे
भविष्यात करणार असलेली कामेे
अलोकांच्या मागणीनुसार घर तिथे रस्ता
अगावामध्ये सांडपाणी भुमीगत गटार व्यवस्था करणे
अनळाद्वारे मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न
अकचर्याची विल्हेवाट लावणे
अगावातील जनतेसाठी आरोग्य उपकेंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार
अगावासाठी मंदिर उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार
अगावातील कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी घंटागाडीची सोय
अशैक्षणिक क्षेत्रात शाळांसाठी लागणार्या सेवा पुरविणार
थेट सरपंच उमेदवार ः संगिता प्रशांत म्हात्रे
वॉर्ड क्र. 1
1.गावंड कमलाकर यशवंत
2.गावंड प्रगती गौरव
3.गावंड नम्रता नितीन
वॉर्ड क्र.2
1.गावंड निखील प्रफुल्ल
2.पाटील अंकित विजय
3.पाटील प्रियंका नित्यानंद
वॉर्ड क्र.3
1.मोकाशी श्याम मेघनाथ
2.ठाकूर रसिका रणजित
वॉर्ड क्र.4
1.जोशी बारकानाथ जनार्दन
- पाटील रसिका भाई
- गावंड दशांकी समर्थ