शिंदे सरकारची उद्या परीक्षा

विधिमंडळात गदारोळाची शक्यता
नार्वेकर, साळवी लढत
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सत्ता बदलानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन रविवारी( 3 जुलै) आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित एकनाथ शिंदे सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रविवारी ही निवडणूक होत आहे.

या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आ.सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version