। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या चर्चेत आहे. टी20 वर्ल्ड कपच्या वेळी सानिया क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित होती. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनलच्या दरम्यान सानिया पाकिस्तान टीमला पाठिंबा देताना दिसली होती. त्याचबरोबर सानिया आता आणखी एका कारणांमुळे चर्चेत आली आहे.
सानियानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका फिल्मी डायलॉगवर अभिनय करत तिचा नवरा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकला टोला लगावत आहे. बेटा, ज्या लोकांना तुमची पर्वा नसेल त्यांच्यापासून दूर राहा या फिल्मी डायलॉगनं या व्हिडीओची सुरूवात होते. त्यानंतर सानिया म्हणते की. मी त्याच्याच घरी राहते. त्यानंतर बेडवर झोपलेला शोएब मलिक या व्हिडीओमध्ये दिसतो. घर की मुर्गी दाल बराबर असं कॅप्शन सानियानं या व्हिडीओला दिलं आहे.