| ठाणे | प्रतिनिधी |
मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या संदर्भात मुंब्रा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 07) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंब्रा ठाकूरपाडा परिसरातील मुंब्रादेवी अपार्टमेंट येथे राहणारी एक 10 वर्षीय मुलगी आपल्या इमारती खाली मुलींसोबत खेळत होती. त्यावेळी शेजारच्या श्रध्दा अपार्टमेंट इमारतीत राहणाऱ्या आसिफ अकबर मन्सूरी (19), याने पिडीत मुलीला खेळणी देण्याच्या बहाण्याने इमारतीमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर पिडीत मुलीला इमारतीच्या व्हेंटिशन डक्टमध्ये फेकून दिले. सोमवारी रात्री 12 च्या सुमारास इमारतीच्या व्हेंटिशन डक्ट मध्ये इमारती वरून काही तरी जड वस्तू खाली पडल्याचा आवाज आल्याची तक्रार इमारतीमधील रहिवाशांनी मुंब्रा पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार यांच्या कडे केली होती.
त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने रूम क्रमांक 103 च्या स्वच्छता गृहाच्या बाजूला असलेल्या उघड्या खिडकीतून बॅटरीचा साह्याने पाहिले असता अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह असल्याचे निदर्शनात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सीडीच्या साह्याने या डक्ट मध्ये उतरून या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. तिला रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठवून दिले. मुंब्रा पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी इमारतीतील तिच्या बरोबर खेळणाऱ्या मुलींची चौकशी केली असता मुलींच्या वर्णनावरून आरोपी आसिफ मन्सूरी याला मुंब्रा पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केली असून, आरोपीच्या बरोबर अन्य साथीदार सहभागी होते का या संदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.