। रोहा । प्रतिनिधी ।
रोह्यातील वरसे येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. तसेच, या 25 वर्षीय आरोपीने आणखी चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहीत पीडित मुलींकडून मिळत आहे. या आरोपीसह त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या दोन भावांना देखील अटक करण्यात आली असल्याचे रोहा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रोहा पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांचा मोठा जमाव जमला होता आणि आरोपीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात येत आहे.