धक्कादायक! वायशेत येथे महिलेवर अत्याचार

। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।

घरामध्ये सफाईच्या कामाच्या बहाण्याने महिलेला बोलावून तिच्यावर शारिरिक अत्याचार केला. तसेच त्यांनतर पुन्हा दोन दिवसांनी आपल्या रिक्षातून वायशेत परिसरातील जंगलभागात नेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नराधमावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 ते दि. 30 सप्टेंबर दरम्यान सदर प्रकार घडला. तालुक्यातील तुडाळ येथील आरोपीने सप्टेंबर 2022 मध्ये आरोपीत याने सफाईचे काम करण्याच्या बहाण्याने पिडीत महिलेला बोलावले होते. सदर महिलेला घरी नेवुन तिला मारहाण करीत या नराधमाने तिच्यावर शारिरीक अत्याचार केले. त्यानंतर दोन दिवसांनी आपल्या रिक्षामध्ये जबरदस्ती बसवुन वायशेत येथील पाईपलाईन रोडने जंगलात नेवुन पुन्हा शारिरीक अत्याचार केले.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.376, 342, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कावळे हे करीत आहेत.

Exit mobile version