। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यात खोपी फाटा येते भर दिवसा गाडीच्या काचा फोडून गोळीबार केल्याचा प्रकार समोरास आला आहे. ही घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे. ही घटना मुंबई – गोवा स्थानकाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार 2 तरुणांनी दुचाकीवर कारचा पाठलाग करत कार थांबवली व कारच्या काचा फोडून हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली व तसेच गोळीबारात वापर केलेल्या रिव्हॉल्व्हरची पुंगळी घटनांस्थळी शोधण्याचे काम सुरु करण्यात आले.
खेड पोलीस निरिक्षक नितीन भोईर यांनी सांगितल्यानुसार ही घटना दुचाकीला कट मारण्याचा रागातून घडलेली आहे असे खेड पोलिसाच्या तपासादरम्यान समजले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासादरम्यान गोळीबार केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही व गोळीबाराची घटना बनाव वाटते असे खेड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तरीही खेड पोलीस ह्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत अशी माहिती खेड पोलीस निरिक्षक नितीन भोईर यांनी दिली.