मुरूडच्या शिरपेचात मानाचा तुरा
| कोर्लई | वृत्तसंस्था |
केरळ येथे द्वितीय सॉर्क आऊरा कप2023 आशियाई कराटे व कोबूडो चॅम्पियनशिप जिम्मी जार्ज इनडोर स्टेडियम, केरळ येथे एशियन रियय.कियू शितो रियू कराटे डो फेडरेशन संस्थेचे अध्यक्ष शिहान डॉ. आदित्य अनिल यांनी आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेत शुभंकरा सचिन राजे हिने सुवर्ण व कास्य पदक मिळवून मुरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या कराटे स्पर्धेसाठी केरळचे दळणवळण मंत्री ॲंथनी राजू हे प्रमुख पाहूणे उपस्थित होते. देशभरातून 1500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मुरूडच्या सर एस.ए. हायस्कूलची विद्यार्थीनी शुभंकरा राजेने या स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक मिळविल्यामुळे मुरुडकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
कराटे चॅम्पियनशिप मध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीचे कौतुक करण्यासाठी चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट मुरूड विश्वस्त मंडळाकडून विश्वस्त सचिन राजे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभंकरा हिचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन समाज अध्यक्षा नैनिता कर्णिक, उपाध्यक्ष अशोक सबनीस, सचिव संदेश मथुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वस्त सुप्रिया मथुरे, हरेष देशमुख, साधना सबनीस यांनीही शुभंकरास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.