। पुणे । प्रतिनिधी ।
सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, रस्तामार्गे आणि पायवाटेद्वारेही पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस, म्हणजे आज, 31 मेपासून 2 जूनपर्यंत किल्ला नागरिक, पर्यटकांसाठी आणि गिर्यारोहकांसाठी पूर्ण बंद राहणार आहे.
गडावर काही स्थायिक रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे. ही सर्व कामे हातानेच करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीस अधिक वेळ लागत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, ही कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. मात्र, तोपर्यंत सिंहगड नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
– मनोज बारबोले, उपवनसंरक्षक