दोन जण गंभीर जखमी
। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात एक गाव प्रवासी कारचा अपघात झाला. हा अपघात शनिवारी (दि. 31) सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मनोर गेट हॉटेल समोर झाला. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई वाहिनीवर प्रवास करणाऱ्या प्रवासी कार चालकाने वाडा खडकोना गावाच्या हद्दीत समोर असणाऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. यावेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाने कारला मागून धडक दिली. त्यामुळे कार दोन वाहनांमध्ये चिरडली गेली. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना व पोलिसांना कटरचा वापर करावा लागला. यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये एका लहान मुलीचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. ग्लोरिया वलेस (73), क्लायटोन वलेस (43), फबोलिया वलेस (45) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.