कर्नाळा परिसरात खैराच्या झाडांची कत्तल

। पनवेल । प्रतिनिधी ।

कर्नाळा ग्रामपंचायतच्या हद्दीत कल्हे गावालगत शेकडो खैरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. जळण्याकरता आवश्यक असणारी लाकडं तोडण्याच्या नावावर अशाप्रकारे औषधी आणि अत्यंत दुर्मिळ अशा खैराची कत्तल करून लाखो रुपयांची त्यातून कमाई केली जात आहे. याकडे मात्र हेतू पुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

कर्नाळा अभयारण्य मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहे. या अरण्यात खैर यासारखे दुर्मिळ वनस्पतीसुद्धा आढळून येतात. आयुर्वेदात या झाडाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. खैरआयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कात अतिशय गुणकारी आहे. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काताची पूड अणि मध घेतात. त्यामुळे खैराच्या झाडांची तोड केली जाते. कायद्यानुसार वृक्षतोड करण्यास बंदी असतानाही कर्नाळा परिसरातील खैराची झाडे वैयक्तिक फायद्यासाठी कापले गेले आहेत. संबंधित ठेकेदाराला वाळलेली जळण्याची लाकड तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यांनी गुणकारी आयुर्वेदिक शेकडो झाडांची एक प्रकारे कत्तल केली आहे. कात करण्यासाठी रात्रीतून ही लाकडे वाहनाने गायब केली आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि इतर पुरावे सोडण्यात आलेले नाही. एकीकडे पक्षी निरीक्षण करण्यासाठी आलेल्या पक्षीप्रेमी त्याचबरोबर अभ्यासाकांबाबत वनविभाग सक्तीने पेस येत असताना दुसरीकडे अशाप्रकारे दुर्मिळ आणि इतर झाडांची कत्तल केली जात आहे त्यावेळी संबंधित अधिकार्‍याने कर्मचारी निद्रस्त अवस्थेत असतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जंगलातील झाडे तोडली
संबंधित ठेकेदाराला वाळलेले जळणाची लाकडं तोडण्यासाठी परवानगी दिल्याचे समजते. परंतु त्याने आतमध्ये लांब जावून साडेतीनशेपेक्षा जास्त खैराची तोड केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्राने दिले आहेत. असे प्रकार सर्रास घडत असून वन विभागाची त्याला फुश असल्याचे बोलले जात आहे.
पेण परिसरात खैराची गाडी पकडली?
कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत कल्हे गावाजवळ असलेल्या जंगलातून खैराची तोड करण्यात आल्याची माहिती आहे. या वृक्षाचे लाकडे कात तयार करण्यासाठी घेऊन जात असताना ते वाहन पेण परिसरामध्ये तेथील वन विभागाच्या पथकाने पकडल्याचे समजते. संबंधितांकडून बॉड घेऊन ती गाडी सोडण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वृक्ष लागवडीचा फार्स
कर्नाळा परिसरामध्ये वनविभागाने हजारो झाडे लावले. परंतु त्याचे संवर्धन आणि संगोपन झाले नाही. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाडे आहेत. यावरून वृक्षांची जोपासना करण्यामध्ये वनविभाग किती दक्ष आहे याचा प्रत्यय येतो.
Exit mobile version