महाडमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड शहरातील पूर निवारणासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात महाड शहरातील सावित्री नदीमधील फुगवट्यामुळे पुरादरम्यान पाण्याचा निचरा होत नसल्याने सदर बेटे/फुगवटे जलसंपदा विभागांतर्गत यांत्रिकी संघटनेमार्फत सावित्री (महाड शहर) व काळ (बिरवाडी) या ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी संघटनेतर्फे सावित्री नदीमधील गाळ काढण्याचे काम 7 एस्कॅव्हेटर (यांत्रिकी-5 व लोकसहभागातून-2). 1 डोझर व 23 टिपर (यांत्रिकी – 13 व लोकसहभागातून 10) याद्वारे सुरु आहे. तसेच काळ नदीवर 1 एस्कॅव्हेटर व 3 टिपर याद्वारे गाळ काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेकापक्षाचे आ.जयंत पाटील यांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना स्पष्ट केले.

आ. जयंत पाटील यांनी आपल्या लेखी प्रश्‍नात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे खुलासा मागितला की, रायगड जिल्ह्यातील महाड शहरात व आजुबाजूच्या 91 गावांमध्ये दिनांक 22 व 23 जुलै, 2021 रोजी वा त्यासुमारास सावित्री, गांधारी व काळ नदी तसेच ग्रामीण भागातील इतर नद्यांना आलेल्या महापुरामुळे स्थावर मालमत्तेचे व शेतीचे प्रचंड नुकसान होवून आर्थिक हानी झाली आहे. या पुरपरिस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर सावित्री, गांधारी व काळ नदीपात्राच्या मुख्य मार्गावरील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून महाड शहरामधील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नद्यांच्या पात्रामध्ये गाळ साठून त्या उथळ झाल्या आहेत का तसे असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन, चौकशीच्या अनुषंगाने सावित्री, गांधारी व काळ नदीपात्रासह महाड शहर व ग्रामीण भागातील नदीपात्रातील साठलेला गाळ काढण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे. तशी काही उपाययोजना केली नसल्यास विलंबाची कारणे काय याबाबतचा लेखी खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागितला.

त्यावर लेखी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सदर वस्तूस्थिती मान्य करीत महापुरामुळे स्थावर मालमत्तेचे, शेतीचे प्रचंड नुकसान होऊन आर्थिक हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. महाड शहरातील पूर निवारणासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात महाड शहरातील सावित्री नदीमधील फुगवट्यामुळे पुरादरम्यान पाण्याचा निचरा होत नसल्याने सदर बेटे/फुगवटे जलसंपदा विभागांतर्गत यांत्रिकी संघटनेमार्फत सावित्री (महाड शहर) व काळ (बिरवाडी) या ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी संघटनेतर्फे सावित्री नदीमधील गाळ काढण्याचे काम 7 एस्कॅव्हेटर (यांत्रिकी-5 व लोकसहभागातून-2). 1 डोझर व 23 टिपर (यांत्रिकी – 13 व लोकसहभागातून 10) याद्वारे सुरु आहे. तसेच काळ नदीवर 1 एस्कॅव्हेटर व 3 टिपर याद्वारे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे विलंब होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचेही जलसंपदा मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version