। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला आहे. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
पुण्यात चाकण परिसरातील कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर एक लहान मुलगा खेळात होता. त्याचवेळी एक कुत्रा लांबून त्याच्या अंगावर भुंकला. त्याने घाबरून कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने मुलाच्या अंगावर झेप घेतली. त्यामुळे मुलगा खाली पडला. त्यापाठोपाठ इतर पाच-सहा कुत्र्यांची झुंड येऊन त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी तिथे येऊन कुत्र्यांना हुसकावून लावले. या हल्ल्यात लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.