| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील ‘द प्रो ब्रेकरर्स’ या संघटनेमार्फत दि.21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान स्नूकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाते. यामध्ये अलिबाग परिसरातील 50 ते 60 खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पेझारी येथील साहिल समजीसकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर श्रीबागमधील सौरभ चाळके याचा द्वितीय क्रमांक, वरसोली येथील सागर देशमुख याने तृतीय क्रमांक आणि अलिबागमधील सर्वेश बंद्री याने चौथा क्रमांक पटकविला आहे. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था कमळ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, द प्रो ब्रेकरर्स क्लबतर्फे द्वितीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कै. दशरथ वाघमारे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द प्रो ब्रेकरर्स क्लबचा उत्साही सभासदांनी मोलाचा सहभाग नोंदविला.
अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात
