समाजक्रांती आघाडीने उपोषण मागे घ्यावे – डॉ. माने

। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
जीएनएम प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी व समाज क्रांती आघाडी रायगड यांनी 18 महिन्याचे नियुक्ती आदेश मिळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले साखळी उपोषण मागे घ्यावे,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

उपोषणकर्त्यांनी 21 मार्चपासून आमरण उपोषण सुरु केले होते. त्यानंतर 26 मार्च 2022 रोजीपासून त्यांच्या उपोषणाचे स्वरूप बदलून साखळी उपोषण सुरु केले. या उपोषणकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन माने यांनी केले आहे.

अधिपरिचारिका वर्ग-3 चे नियुक्ती प्राधिकारीहे उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे हे असल्याने या जीएनएम प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना उपसंचालक, आ.से. मुंबई मंडळ ठाणे यांनी 6 महिन्याचे नियुक्ती आदेश निर्गमित केलेले आहेत. हे आदेश स्विकारण्यासाठी उपसंचालक व या कार्यालयाकडून रजिस्टर पोहोच पावतीने त्यांच्या पत्यावर निर्गमित केले आहेत. त्यामुळे हे आदेश स्विकारून उपोषण स्थगित करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास द. माने यांनी स्वत: उपोषणकर्त्यांना वेळोवेळी विनंती केली.

Exit mobile version