। अलिबाग । प्रतिनिधी ।
सामाजिक बांधिलकी जपत माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबागमधील बंदराच्या कामासाठी मदतीचा हात दिला. त्यामुळे अलिबागमधील मच्छिमार संघाच्या वतीने त्यांचा मंगळवारी सन्मान करण्यात आला. एका धार्मिक कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
अलिबागमधील मच्छिमारांसह कोळी समाजाच्या विकासासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सतत काम केले आहे. या परिसरात वेगवेगळ्या सुविधा कशा पुरवता येतील याकडे त्यांनी कायमच लक्ष दिले आहे. नुकतेच अलिबाग बंदरात जेट्टी बांधण्याचे काम कोळी समाजाने केले. या कामासाठी प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला. त्यामुळे कोळी समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. नुकताच अलिबाग कोळीवाड्यात एक धार्मिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत नाईक यांनी भेट दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधत अलिबाग मच्छिमार संघटनेच्यावतीने प्रशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला.