| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
बेणसे गावात श्री हनुमान मंदिरात श्री सत्यनायणाच्या पूजा निमित्ताने श्री बाबुजी सोंगी भारूड (खालापूर चिलठण) येथील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक भावू गायकर व मंडळाने या कार्यक्रमात प्रबोधन व विविध वेषभूषा साकारून मनोरंजन करण्यात आले. भारूड पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक, महिला, पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.
साधूराम खंडू कुथे व राजेश गोविंद गोरे यांचे महत्वपूर्ण भारुड आयोजनात विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात छ. शिवाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमाची गौरव गाथा दाखविणारे नाट्य सादर करण्यात आले. तसेच गणेश पूजन, शंकर पार्वती, कृष्ण गौलन, राम-लक्ष्मण-सीता-हनुमान, दादला नको ग बाई, देवी दर्शन, वारीक वारीक, होड़ी, देवारा, वेडी, नवरा बायको, नंदी बैल, विठ्ठल जनाई आदी वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले होते. यावेळी कलाकार व भजनी मंडळी यांना उपस्थितांकडून भरघोस रोख बक्षीस मिळाली. कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली बेणसे येथील महिला व तरुण मंडळाने कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.