लॉन टेनिसमध्ये स्पर्श अजिंक्य

| अलिबाग | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय लॉनटेनिस अजिंक्यपद स्पर्धा दि. 26 व 27 नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील कोल्ही-कोपर गावचा मूळ रहिवासी व सध्या नवीन पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या स्पर्श संतोष पाटील याने अजिंक्यपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने यजमान नाशिक जिल्ह्यातील अर्चन पाठक याचा 4-2, 4-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या कामगिरीच्या जोरावर स्पर्शची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

स्पर्शच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. पुष्कर लेले तसेच इतर उपस्थित पाहुण्यांनी अभिनंदन केले. त्याच्या यशात वडील संतोष पाटील, आई पल्लवी पाटील तसेच बहीण तन्वी पाटील व प्रशिक्षक अरुण भोसले (NMSA/ASA) यांचा मोठा वाटा असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. स्पर्शच्या यशाबद्दल त्याचे आजोबा साईमार्ट, पेझारीचे मालक विलास म्हात्रे, रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच सर्व नातेवाईक व कोल्ही-कोपर ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version